शिराळा,ता.८: शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी दिव्यांग ५ ,महिला व बालकल्याण १० व मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी असणारा १५ टक्के निधी हा ग्राम स्तरावर खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी .या मागणीसाठी शिराळा पंचायत समिती कार्यालयासमोर भारतीय दलित महासंघाच्यावतीने निदर्शनात्मक "जवाब दो "आंदोलन करण्यात आले. यावेळी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांची आयोगाद्वारे उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शिराळा पंचायत समिती समोर सामुदायिक आत्मदहन केले जाईल असा इशारा ही दिला आहे.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत कांबळे म्हणाले, दिव्यांग, महिला व बालकल्याण आणि मागासवर्गीय समाजासाठी असणारा निधी खर्च न झाल्या बाबत २३ मे रोजी निवेदन दिले होते.मात्र त्या निवेदनाची दखल घेतली नाही. या निधीचा गैरवापर केला जात आहे.त्यामुळे आम्ही आमच्या मागणीची दखल न घेतल्याबद्दल या प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहे.शासकीय योजनांची व शासन निर्णयाची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. शासनाने शिराळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची दप्तर व ग्रामनिधी बँक खात्यांची तपासणी करून शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तरावर संबंधित निधी त्या घटकावर खर्च झालेला आहे की नाही याची निपक्षपातीपणे उच्चस्तरीय चौकशी करावी. सांगली जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी आयोग नेमून दोषी अधिकाऱ्यांच्या वर कारवाई करावी.
यावेळी संघटनेचे दिलीप मोरे,विनोद आढाव ,अमोल बडेकर, धनाजी तुपारे,सुजल कांबळे , दिलीप सोनवणे, प्रकाश महापुरे ,मनोज गायकवाड, दयानंद कांबळे ,आकाश कांबळे ,संतोष कट्टे, बाबासो कांबळे, सुरेश मोहिते, विनोद कांबळे, विक्रम शेळके ,संदीप पाटील उपस्थित होते.
0 Comments