BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दहा लाखाचा धनादेश वितरण 10 lakh check distribution


 शिराळा,ता. २४:  शित्तूर वारुण( ता,शाहुवाडी)  येथील चांदोली अभयारण्यालगत असणाऱ्या तळीचावाडा येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सारिका गावडे हिच्या कुटुंबाला वन विभागामार्फत दहा लाखाचा धनादेश शाहुवाडीचे तहसीदार रामलिंग चव्हाणआणि मलकापूर वनक्षेत्रपाल अमित भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. उर्वरित १५ लाखांची मदत लवकरच देण्यात येणार आहे. त्या गावडे कुटुंबाला एकूण २५ लाखांची मदत मिळणार आहे.

यावेळी मयत सारिकाचे वडील बबन गावडे ,तानाजी वाघमोडे,वनपाल दत्तात्रय जाधव  उपस्थित होते.सोमवारी सारिका आई समवेत घरा शेजारी असणाऱ्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी  त्या परिसरातील  गवत व झाडीत दाबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर पाठी मागून हल्ला केला होता. त्यावेळी तिच्या आईने आरडाओरडा केला असता बिबट्या पळून गेला.मात्र त्या बिबट्याच्या हल्यात सारिका जागीच गतप्राण झाली होती.बुधवारी गावडे कुटुंबियांच्या घरी जाऊन खासदार धैर्यशील  माने यांनी त्यांचे सांत्वन केले.

Post a Comment

0 Comments