BREKING NEWS ----- --शिराळ्यात अंबरनाथची बैलजोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी --------------------------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत वैष्णवी म्होपरेकरचे यश Vaishnavi Mhoprekar's Success in Dr. Homi Bhabha Children's Scientist Competitive Exam

 


शिराळा,ता.१६:अंत्री बुद्रुक (ता.शिराळा) येथील  महात्मा फुले विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या  सहावीच्या वैष्णवी कुमार म्होपरेकर हिने डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले.

 विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे व विज्ञानात विशेष प्रतिभा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन तर्फे राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची पहिली निवड यादी जाहीर झाली. यामध्ये वैष्णवी कुमार म्होपरेकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत शिराळा तालुक्यातून एकमेव स्थान पटकाविले.त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला सौ.सरिता जाधव,सौ.जे.एस.गवई, मुख्याध्यापक प्रशांत कदम व शिक्षक आर.ए.थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments