शिराळा येथे प.पु.स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष व शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती अॅड भगतसिंग नाईक यांचे चिरंजीव पृथ्वीसिंग नाईक व विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम (बंडा नाना ) यांची कन्या कश्मिरा यांचा विवाह शिराळा येथे छत्रपती विद्यालयाच्या भव्य पटांगणात राजेशाही थाटात हजारो लोकांच्या उपस्थिती संपन्न झाला.
या वेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भाजप नेते सत्यजित देशमुख ,भाजप नेते राहुल महाडिक,भाजप नेते सम्राट महाडिक,साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,शिवसेना जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, सागंली जि.पं.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, खंडेराव जाधव,राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील,जंगली महाराज शिक्षण संस्थचे संथापक एकनाथराव जाधव,रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील,माजी नगरसेवक केदार नलवडे, शिराळा बाजार समितीचे उपसभापती विजय महाडिक, कुंडल चे महेंद्र आप्पा लाड, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, शहाजी पाटील, यांच्या सह कला,क्रीडा,सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील विविध मान्यवर व सर्व नाईक व कदम कुटुंबीय उपस्थित होते.
0 Comments