BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मित्राला भेटायला निघालेला युवक अपघातात ठार A youth who was going to meet a friend was killed in an accident


  शिराळा,ता.२१:येथील बाह्य वळण रस्त्यावरील गोरक्षनाथ मंदिरा जवळ मोटरसायकल व चारचाकी गाडीची  धडक होऊन झालेल्या  अपघातात मोटारसायकलस्वार संतोष उत्तम ताईंगडे ( वय ३५, रा.तळमावले  ता.पाटण , जि. सातारा)  हा युवक ठार झाला. ही घटना शुक्रवार २१ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या  सुमारास घडली.याबाबत फिर्याद प्रीतम प्रदीप हसबनीस दिली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की ,संतोष ताईंगडे हे मांगले येथील मित्राला भेटण्यासाठी मोटारसायकल वरून निघाले होते. यावेळी करण हरिभाऊ सोमोशे ( वय २५ , रा.पलूस ) हे कोकरूड कडून पलूस कडे चारचाकी गाडी घेवून निघाले होते. यावेळी या दोन्ही गाड्यांची धडक झाली.यामध्ये मोटारसायकलस्वार संतोष ताईंगडे यांचा मृत्यू झाला. पुढील तपास  शिराळा पोलीस करीत आहेत.संतोष  मुंबई येथील खाजगी कंपनीत फार्मासिस्ट म्हणून नोकरीस होते. त्यांच्या पश्चात आई ,वडील,पत्नी,एक मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments