BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात बिबट्याचा वावरLeopard communication at Shirala /

 


शिराळा: येथील शिराळा - कदमवाडी रस्ता येथे बिबट्यांनी हल्ला करून कुत्रे ठार मारले. गुरुवारी रात्री नऊ वाजता सदरचा प्रकार घडला. शिराळा शहरात कदमवाडी रस्त्यालगत संजय दत्तात्रय कदम यांचे घर आहे. त्यांचे कारवान जातीचे दोन पाळीव कुत्रे आहेत. यातील एक कुत्रे बाहेर सोडून दिले असता त्याच्या पाठीमागे गेली काही क्षणात त्यांच्या पुढे बिबट्याने झेप घालून त्यांच्या समोर कुत्रे ओढत घेऊन गेला. रमा कदम यावेळी थोडक्यात बचावल्या. त्या नंतर मोठी गर्दी झाली. थोड्या वेळात वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक हणमंत पाटील, संतोष कदमयांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या परिसरात आणखी काही दिवस बिबट्याचा वावर असणार आहे. बिबट्या नर व मादी त्यांची दोन पिले या परिसरात फिरत आहेत. त्यामुळे परिसरात भीती व दहशतीचे वातावरण आहे. परिसरातील लाईट व वीज पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. आठवड्या पूर्वी शहाजी यादव, संतोष कदम हे दिवसा शेताला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या दिसला होता. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments