BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गुंगीचे औषध देऊन केले महिलेचे दागिने लंपास The woman's jewelery was stolen by giving gungi medicine

 शिराळा,ता.२९:येथील श्री.दत्त मंदिरामध्ये कमल बाळासाहेब पाटील ( वय ७२,रा. बेलदारवाडी ) या वृद्ध महिलेच्या अंगावरील दीड तोळ्याचे दागिने गुंगीचे औषध देऊन एका महिलेने चोरून नेले. हि  घटना आज सोमवार (ता.२९) रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास  घडली.

   याबाबत माहिती अशी ,कमल पाटील ह्या शिराळा येथे  आठवडा बाजारासाठी आल्या होत्या. त्या दत्त मंदिर जवळ आल्या असता. एक महिला त्यांचे जवळ आली. या महिलेने तुमच्याकडे काम आहे जरा मंदिरात जाऊ असे सांगितले.त्या दोघी मंदिरात गेल्या व त्यावेळी संशयित महिलेने कमल यांच्या हातात एका रुमालात बांधलेली वस्तू दिली.यानंतर कमल पाटील यांना काहीच समजले नाही. ज्यावेळी कमल पाटील या शुद्धीवर आल्यावर त्यांच्या गळ्यातील दोन पदरी मोहन माळ,कर्णफुले,बुगडी असा अंदाजे दीड तोळ्यांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. यानंतर संशयित महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही.हा प्रसंग येथील प्रमुख मार्गावर असणाऱ्या सी.सी.टी,व्ही मध्ये कैद झाला आहे.याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.


Post a Comment

0 Comments