शिरशी :येथे महसूल पंधरावड्याचा शुभारंभ प्रसंगी लाभार्थी महिलांचे अर्ज स्वीकारताना अंगणवाडी सेविका मालुताई भोसले, मंडल अधिकारी सोनाली गायकवाड, कोमल पाटील , पोपट महिंद, प्रसाद पाटील.
शिराळा,ता.२ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळवा यासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन शिरसी मंडल अधिकारी सोनाली गायकवाड यांनी केले.
शिरसी (ता.शिराळा ) येथे राज्य शासनाच्यावतीने साजरा करण्यात येत असलेल्या महसूल पंधरावड्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.१ ऑगस्टला महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी गायकवाड म्हणाल्या , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कोणतीही लाभार्थी वंचित राहणार नाही.याची दक्षता अंगणवाडी सेविकानी घ्यावी. लाभार्थींना लागणाऱ्या सर्व कागदपत्रासाठी सहकार्य तसेच मार्गदर्शन करावे. लाभार्थीच्या रेशनकार्ड मध्ये काही अडचण असतील तर ताबडतोब महसूल विभागाच्या निदर्शनास आणून द्याव्यात. असणाऱ्या अडचणी महसूल विभागांकडून सोडविण्यात येतील. महसूल पंधरावड्याच्या निमित्ताने, शिरशी मंडलमध्ये विविध उपक्रम राबवून, लोकांच्या संबंधित विभागातील काही अडचणी असतील तर तात्काळ सोडवल्या जातील .
यावेळी उपसरपंच पोपट महिंद, राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थ तलाठी कोमल पाटील, ग्रामसेवक प्रसाद पाटील, दिलीप मोहिते , अंगणवाडी सेविका मालुताई भोसले, संगीता येळवे, छाया महिंद , सुमन भोसले, रेश्मा यादव, सोनाली मोहिते, सविता शिंदे, लक्ष्मी नाटोलकर, रेखा साठे, रूपाली भोसले उपस्थित होत्या.
0 Comments