शिराळा,ता.११: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या निर्देशानुसार दिवाणी व फौजदारी न्यायालय, शिराळा येथे २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले असल्याची माहिती तालुका विधि सेवा समिती शिराळचे अध्यक्ष न्यायाधीश एस. ए. सुरजुसे यांनी केले आहे.
. यावेळी सुरजुसे म्हणाले, लोक अदालतीत दावा पूर्व,धनादेश, दिवाणी व फौजदारी, बँकांची कर्जे, दूरध्वनी, वीज, पाणीपट्टीकर इत्यादी देयकांची विविध प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी लोक अदालत मध्ये ठेवावीत व ती मिटवावीत. लोक अदालतीत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत असे आव्हान सुरजुसे यांनी केले आहे. सदर राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे व सांगली जिल्हा विधी प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले आहे.
0 Comments