BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले येथील बँकेत चोरीचा प्रयत्न Bank robbery attempt at Mangle

 


शिराळा: १६ सप्टेंबर २०२४ : मांगले (ता.शिराळा) येथील बॅंक ऑफ इंडीयाच्या  शाखेत रविवार ता.१५  रोजी रात्री  शाखेच्या लोखंडी दरवाजाचे शटर उचकटून, चोरीचा प्रयत्न केला.मात्र तो अयशस्वी झाला.याबाबत शाखाधिकारी अनिल चोरमोरे वय २९ (रा.येणपे -चोरमारवाडी ता.कराड )सध्या शिराळा  यांनी शिराळा पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.ही घटना रविवारी रात्री आठ ते सोमवरी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.  मुख्य बसस्थानक चौकाच्या जवळ ही घटना घडल्यामुळे सकाळी लोकांची गर्दी झाली होती .

 याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरट्यांनी मांगले येथील पशुवैद्यकीय केंद्राच्या कंपॉंडच्या भिंतीवरून उडी मारून स्व. विलासराव पाटील मोरणा दुध संस्थेच्या दुस-या मजल्यावरील भाड्याने दिलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवार  ता.१६ रोजी सकाळी सहा वाजता दुध संस्थेचे कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  चोरट्यानी मोरणा दुध संस्थेच्या प्रवेश द्वारावरील लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून जवळच असणा-या विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा बंद करून दुस-या मजल्यावर प्रवेश केला. यावेळी त्याठिकाणी असणारा सीसीटीव्ही बाजूला फिरवून शाखेच्या मुख्य दरवाजाचे शटर उचकटले. त्यांनतर आतील लोखंडी सळईच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुलूप न तुटल्यामुळे दरवाज्याच्या सळ्या प्रवेश करता येईल एवढ्या उचकटून आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असून त्यात चेहरा झाकलेला एक चोरटा दिसून येत आहे. चोरट्यांनी  शाखेत प्रवेश करताच प्रथम आतील सीसीटीव्ही यंत्रणेच्या केबल,बँकेच्या सायरनच्या वायर तोडून टाकल्या .त्यांनतर टेबलाचे ड्राँवर उघडून कागदपत्रे विसकटून टाकली ,त्यांनतर आतील बँकेच्या लॉकरचा दरवाजा कटावणी सारख्या लोखंडी साधनाने उघडण्याचा प्रयत्न केला .त्यावेळी  लॉकरच्या दरवाजाचा हॅन्डलवर घाव घालून लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी हॅन्डल मोडल्यामुळे चोरट्-याचा प्रयत्न अयशस्वी झाला .सोमवारी सकाळी शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम ,इस्लामपुरचे पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटना स्थळावर भेट देवून  प्रत्यक्ष पाहणी केली. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकाद्वारे तपासणी केली.पुढील तपास राहुल अतिग्रे करत आहेत.

Post a Comment

0 Comments