BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा शहर परिसरात ड्रोनच्या घिरट्या Drone hovering in Shirala city area

 


शिराळा:सुजयनगर- कापरी ( ता.शिराळा) करमाळे पाठोपाठ आता शिराळा शहर , भाटशिरगाव येथील परिसरात दोन ड्रोन फिरत असल्याचे आढळून आले आहे.मंगळवार  रात्री साडेअकराच्या दरम्यान पुन्हा ड्रोन दिसला.सदर ड्रोन पोलीस विभागाचा नसल्याचे सांगण्यात आले आहे.मात्र यामुळे यापरिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी याची माहिती दिली आहे.या गावाच्या परिसरात रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत दोन ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांना दिसले आहेत. रविवारी दि.८रोजी  दुपारी बारा च्या दरम्यान येथील बोअर जवळ मार्गदर्शक हात नकाशा येथील ग्रामस्थांना आढळून आला होता. यामध्ये किती वाजता कोठून यायचे , कोणते घर फोडायचे , कोणत्या मार्गाने पळून जायचे तसेच या परिसरातील रस्ते , घरे अडीच उल्लेख केला आहे.रविवारी रात्री पुन्हा ड्रोन नागरिकांना दिसला.

   करमाळे येथील गावात दोन दिवसा पासून रात्री साडे आकारा नंतर ड्रोन फिरत असल्याचे आढळून आले आहे.आता मंगळवार दि.१०रोजी शिराळा येथील प्रोफेसर कॉलनी तसेच भाटशिरगाव येथील अलुगडे वस्ती याठिकाणी ड्रोन फिरताना नागरिकांनी पाहिले आहे.त्यामुळे लोकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे नागरिक व पोलिसांची गस्त सुरू केली आहे.

या ड्रोन बाबत नागरिकांनी कळविले असून हे ड्रोन पोलीस विभागाचे नाही.चिट्ठी व ड्रोन यामध्ये काय संबंध आहे का? याबाबत शोध घेत आहे. नागरिकांनी भिऊ नये.भाटशिरगाव , शिराळा शहरात ड्रोन दिसल्याचे नागरिकांनी काळविल्यावर तातडीने याभागात तपासणी करून गस्त वाढवली आहे. रविवार पासून नागरिक तसेच पोलिसांची गस्त यापरिसरात सुरू केली आहे.संशयास्पद काही आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक , शिराळा

Post a Comment

0 Comments