BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ चे चार चौक बनले ब्लॅॅक स्पॉट Four squares became a black spot



 शिराळा शहराच्या बाह्यवळण रस्त्यावरील  औद्योगीक प्रशिक्षण संस्था, कापरी नाका, गोरक्षनाथ फाटा मांगले रस्ता  व गोरक्षनाथ फाटा चिखली रस्ता हे चार  चौक प्रवाशी वर्गासाठी ब्लॅॅक स्पॉट बनले आहेत. या ठिकाणी गतीरोधक बसवून धोक्याची सूचना देणारे ठळक अक्षरातील मोठे फलक लावणे गरजेचे आहे. वांरवार होणाऱ्या अपघातामुळे या मार्गावर आता पर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागा असून काहीना अपंगत्व आले आहे.

  शिराळा येथील  बाह्यवळण रस्त्यावरून इस्लामपूर,कराड येथील पेठ नका येथून कोकरूडकडे व कोकणात जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. या मार्गावरून अवजड वाहनाची मोठ्या प्रमाणत वाहतूक सूरु असते. शिराळा येथे बाह्यवळण रस्त्याची सुरुवात औद्योगीक प्रशिक्षण संस्था चौकातून होते. येथे  शिराळा - इस्लामपूर ,  कापरी नाका येथे  कापरी - शिराळ्या कडून, गोरक्षनाथ फाटा मांगले रस्ता येथे शिराळा - मांगलेकडे कडून व  गोरक्षनाथ फाटा चिखली रस्ता येथे शिराळा - चिखलीकडून व बाह्यवळण रस्त्यावरून मुख्यमार्गाने ये-जा करणारी वाहने यांना आपण चाललेला मार्गच प्रमुख मार्ग असल्याचे वाटते. त्यामुळे आपल्या वेगावर कोणी नियंत्रण ठेवत नाहीत. बाहेरील प्रवाशांना रस्त्याच्या अंदाज येत नसल्याने  प्रत्येकाचा वेग वाढलेला असतो.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. येथे होणारे अपघात हे चारचाकी व मोटरसायकल यांच्या धडकेचे जास्त आहेत.त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.आहे.दोन दिवसापूर्वी निगडी येथील प्रथमेश साळुंखे याच्या मोटारसायकलला मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तर सव्वा महिन्या पूर्वी  देववाडी येथील दिलीप खोत यांचा हि ट्रकने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. महिन्या दोन महिन्यात एकाचा तरी बळी जातोच. 

 प्रत्येक चौकात  स्वयंचलीत  सिग्नल बसवले आहेत. मात्र वाहनधारक याकडे दुर्लक्ष करून जात असल्याने अपघात वाढ होत आहेत. त्यामुळे चौका चौकात रबरी गतीरोधक बसवून  धोक्याची सूचना देणारे ठळक अक्षरातील मोठे फलक लावणे गरजेचे आहे.

वसंत कांबळे (वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष )

Post a Comment

0 Comments