शिराळा,ता.१८:शिरसी (ता.शिराळा) येथील नारकर कुटूंबायांनी मुलाच्या वाढदिवसासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून प्राथमिक शाळेला वीस वृक्ष कुंडीसह भेट दिले.
येथील जिल्हापरिषद शाळेमध्ये मुलगा कैवल्य नारकर हा इयत्ता पहिली मध्ये शिकत होता. एक वर्ष शाळेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. त्याची अभ्यासात झालेली प्रगती लक्षात आली. काही कारणामुळे कैवल्य पालकासोबत बाहेरगावी शाळेला गेला. आपला मुलगा बाहेरगावी शाळेला असला तरी कैवल्याच्या आई गौरी नारकर यांनी आपला मुलगा माजी विद्यार्थी असल्याने या शाळेच्या संपर्कात नेहमीच राहिल्या. शाळेच्या मदतीसाठी व प्रगतीसाठी आपल्याकडूनही हातभार लावला शाळेंची आठवण कायम स्वरूपी राहावी म्हणून, त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने करण्याचे केला. त्या खर्चामध्ये शाळेला सुमारे वीस झाडे कुंडीसह भेट दिली. यावेळी उपसरपंच पोपट महिंद, मुख्याद्यापिका प्रमिला देसाई ,शिक्षक शिवाजी सूर्यवंशी, सुवर्णा सुतार,अनिल माने,मीना भुर्के,गौरी नारकर,कैवल्य नारकर, श्रीधर पाटील ,विशाल भोसले,अनिकेत भोसले हे उपस्थित होते.
0 Comments