BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बांधकाम कामगारांना व्यक्तीगत लाभांचे सानुग्रह अनुदान एक महीन्याच्या आत मिळावे-आमदार सत्यजित देशमुख

 


  आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 शिराळा :बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणी झालेल्या कामगारांना व्यक्तीगत लाभांचे सानुग्रह  अनुदान एक महीन्याच्या आत मिळावे. बांधकाम कामगांरासाठी अटल घरकुल योजनेची प्रभावी अंमल बजावणी करावी अशी मागणी अर्थसंकल्पी अधिवेशनात  आमदार सत्यजित देशमुख यांनी केली.यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे सांगितले.

        विधिमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशनात बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याबाबत व सोयी मिळण्याबाबत आमदार सत्यजित देशमुख यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

    यावेळी आमदार  देशमुख म्हणाले, बांधकाम कामगार मंडळाकडे  नोंदणीकृत असणारे कामगार यांना व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. अटल घरकुल योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना देण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविण्यात यावी. जेणेकरून त्या कामगारांना आपल्या हक्काचे घर मिळेल. 

त्याचबरोबर विद्यार्थी शिष्यवृत्ती, अपघात खर्च,अपघाती मृत्यूचा खर्च, वैयक्तिक लाभाचा खर्च, वैयक्तिक निधी, विधवा पत्नीला मिळणारे अनुदान हे अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित लाभार्थ्याला मिळावे.  दिल्ली व गुजरात सरकारने ज्या पद्धतीने स्वयंघोषणा पत्रावर बांधकाम कामगारांना ग्राह्य धरले आहे. त्याच पद्धतीने आपल्या सरकारने देखील स्वयंघोषणा पत्रावरती बांधकाम कामगार ग्राह्य धरण्यात यावे.

Post a Comment

0 Comments