शिराळा,ता.४:दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या जीवनचरित्रावरील महेश बनसोडे दिग्दर्शित " चल हल्ला बोल' या चित्रपटास परवानगी नाकारुन " कोण है नामदेव ढसाळ ?आम्ही ओळखत नाही" अशा पध्दतीची अवमानकारक नोटीस देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी तहसीलदार श्यामला खोत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे,हिंदी,इंग्रजी,मराठी चित्रपटातील हिंसेला व अश्लिलतेला प्राधान्य देवून त्यांना परवानगी देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण करणाऱ्या पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांच्या कविता अश्लिल व शिवराळ असल्याची कारणे देवून चित्रपटास परवानगी नाकारणे म्हणजे हा मुर्खपणाचा कळस आहे.शोषित,पिडीत व उपेक्षितांचा हुंकार असणाऱ्या महानायकाचे साहित्य जगातील सात भाषेमध्ये प्रकाशित झाले असुन त्यांच्या साहित्याची,विद्रोही कवितांची व त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईची दखल घेवून केंद्र शासनाने त्यांना " पद्मश्री ' " या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.अशा साहित्यीकाच्या जीवनचरित्रावर आधारीत असणाऱ्या चित्रपटास अवमानकारक नोटीस देवून परवानगी नाकारणे म्हणजे शोषित, पिडीत,उपेक्षितांचा आवाज दडपणे होय.शासनाने सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीची संवेदनशीलरीत्या दखल घेवून त्यांच्यावर तात्काळ् कारवाई करुन " चल हल्ला बोल" या चित्रपटास तात्काळ् परवानगी द्यावी.
निवेदनावर दयानंद शिवजातक,दिलिप मोरे, विनोद आढाव,अमोल बडेकर, रोहित महिंद, शुभंम साखरे,योगेश पवार, धनाजी तुपारे,शशिकांत कांबळे, सुरेश कांबळे यांच्या सह्या आहेत.
0 Comments