BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बांबरवाडी रौप्य महोत्सवी पारायणाची सांगता


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   

 बांबरवाडी (ता.शिराळा) येथे तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या पारायण सोहळ्याचे हे २५ वे वर्ष असल्याने रौप्य महोत्सवानिमित्ताने विविध धर्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळ व संध्याकाळ महाप्रसाद म्हणून दोन वेळ जेवणाची सोय केली होती.सर्व लोकं देवळात प्रसादासाठी  एकत्रित येत असल्यामुळे  सात दिवस वाडीत चूल बंद होती. त्यामुळे एक आठवडाभर वेगळया सामाजिक सलोख्याचे वातावरण तयार झाले होते.

असा झाला पारायण सोहळा 

 

हा पारायण  सोहळा ९ ते १६ मार्च पर्यंत सुरु होता.यावेळी बाजीराव भाडुगळे(भाडुगळे),हनुमान बडे (देवाची आळंदी ),दादा महाराज मानेवाडी,विजय महाराज रामीष्ठे,बाबुराव महाराज मस्करवाडी,उत्तम पुजारी महादेववाडी,संतोष नलवडे काळगाव,जयवंत पाटील राधानगरी यांचे प्रवचन व कीर्तन झाले. गुढे, ढाणकेवाडी, बांबरवाडी, बेंद, भाडुगळेवाडी, मणदूर धनगरवाडा,करपेवाडी, तेटमेवाडी,निवी,मानेवाडी,पाचगणी,काळगाव धनगरावाडा, येसलेवाडी, गुंडगेवाडी, कोकणेवाडी, जळकेवाडी,आरळा, खोतवाडी,बेरडेवाडी,विठ्ठलवाडी येथील भजनी मंडळाने साथ दिली.

पहाटे चार ते पाच काकड आरती,आठ ते ११ वाचन,सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ,६ते ७प्रवचन,रात्री ९ ते ११ कीर्तन,साडे अकरा नंतर हरी जागर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठ चालक म्हणून मोहन महाराज,गायनाचार्य जगन्नाथ महाराज,मृदूंगमणी दीपक महाराज आळंदी,हार्मोनियम वादक म्हणून भीमराव महाराज आरळा यांनी काम पाहिले.शनिवारी सकाळी अभिषेक करून सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला.त्यानंतर  चंद्रकांत बर्गे चिंचनेर (निंब) सातारा यांच्या भारूडाचा कार्यक्रम झाला.रविवारी सकाळी ८ ते १० गाथा प्रतिमा व दिंडी मिरवणूक काढण्यात आली. मोहन महाराज आळंदी यांचे काल्याचे कीर्तन झाले.दुपारी महाप्रसादा नंतर  कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments