BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-जिल्हाधिकारी अशोक काकडे






आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा: शिराळा तालुक्याची निसर्ग संपदा समृद्ध असून, याठिकाणी पर्यटनास मोठा वाव आहे. पर्यटन वाढवून स्थानिकांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने रोजगारवृद्धीसाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

शिराळा तालुक्याच्या पर्यटनवाढीच्या अनुषंगाने शिराळा येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी काकडे यांनी चांदोली व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण, शिराळा येथील भुईकोट किल्ला याची पाहणी केली. यावेळी महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग आदि विभागांचे अधिकारी सोबत होते. 

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शिराळ्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी शासन व खाजगी उद्योजक यांच्या एकत्रित गुंतवणुकीतून तीन वर्षात कोणत्या प्रकारे ही काम करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येईल. याचबरोबर स्थानिक नागरिकांचा आर्थिकस्तर वाढविण्यासाठी पर्यटनस्थळ विकास करताना चांदोली परिसरातील ३० - ४० गावांचा समावेश करून एकत्रित विकास साधता येईल. यामधे निवास व न्याहरी, मध प्रकल्प आदि सुविधा उपलब्ध करून देता येतील. स्थानिक उत्पादनांची विक्रीही या माध्यमातून करता येईल. मुलांच्या शैक्षणिक सहली आयोजित केल्यास त्यांनाही येथील वनस्पती, प्राणी, राहणीमान, कौटुंबिक प्रेम आदिंबाबत माहिती होईल. पर्यटकांना वन्यप्राणी यांचे आकर्षण वाढेल.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, चांदोली वन्यजीवच्या प्रकल्प उपसंचालक स्नेहलता पाटील, तहसीलदार शामला खोत पाटील, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, अमित भिसे, उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील, ऋषिकेश पाटील, सुदामा कुंभार आदि उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments