शिराळा,ता.३०: साध्य गणेशोत्सव असल्याने सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात वेगवेगळे समाज प्रबोधन व मंदिर,किल्ले यांचे हुबेहूब देखावे केले जात आहेत. ते सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. मात्र शिराळा तालुक्यातील ढाणकेवाडी येथील सुतार कुटुंबीयांनी घरगुती गणपतीसाठी आपल्या आजोबांनी बांधलेल्या पुरातन मारुती मंदिराचा देखावा आपल्याच घरात उभारून आजोबांच्या कलेचा वारसा जोपासत त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला आहे. तो देखावा शिराळा पश्चिम भागात आकर्षण ठरला आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगराच्या पायथ्याशी वसलेली छोटीसी वाडी म्हणजे ढाणकेवाडी. या वाडीला सांस्कृतिक वारसा आहे. याच वाडीतील सुतार कुटुंब आपल्याकडे असणाऱ्या पारंपारिक व्यवसायाला जोडून आपली कला जोपासत आहेत. एक वेगळा छंद म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षापासुन घरगुती गणपतीसाठी हुबेहूब हालते देखावे बनवुन गणेश भक्तांते लक्ष वेधत आले आहेत. गेल्या पाच वर्षात वासुदेव,मंगळागौरी,विहीरीवरील मोट,केदारनाथ मंदीर,चांदोली धरण असे हालते देखावे करुन गणेश भक्तांचे लक्ष वेधले होते.यावर्षी त्यांनी पौराणिक १९७८ सालच्या ढाणकेवाडी येथील पुरातन मारुती मंदीराचा देखावा केला.हा देखावा त्यांनी घरीच सात फुट बाय नऊ फुट जागेत उभारला आहे.संपुर्ण देखावा लाकडापासुन बनवलेला आहे.मंदीराचे दगडी बांधकाम,फरशी,खिडक्या,तुलसी वृंधावन हुबेहुब बनवलेले आहे. त्यासाठी लाकूड,फरशी यांचा वापर केला आहे. हा देखावा पूर्णतः पर्यावरण पूरक आहे.यात कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केलेला नाही. सन १९७८ साली दगडू गणु सुतार व रामु गणु सुतार ढाणकेवाडी या दोन भावांनी या मंदीराचे सुतारकाम केले होते.त्यांचा वारसा जपण्यासाठी त्यांचे नातू व परतुंड यांनी घरच्या गणपतीला ढाणकेवाडी येथील पुरातन मारुती मंदीराचा हुबेहुब देखावा उभारला आहे.देखावा बनविण्यासाठी गुढे पोलिसपाटील श्रीपती सुतार यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले.सचिन श्रीपती सुतार,प्रवीण मारुती सुतार,रोशन विश्वास सुतार,शिरीष दिलीप सुतार यांनी रात्रंदिवस जागून तीन दिवसात हे मंदिर उभारले आहे.
.jpg)
0 Comments