शिराळा,ता.१:मजबूत महाराष्ट्र करण्यासाठी गावांतर्गत असणारे सर्व पाणंद रस्ते महत्वाचे आहेत.महसूल खाते महाराष्ट्राच्या विकासाचा खरा आरसा आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक चांगल्या कामाचा सन्मान आपल्या तालुक्याला मिळावा असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे तहसीलदार कार्यालयात महसूल दिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार देशमुख म्हणाले,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल बाबत नेहमीच अभिनव उपक्रम राबविले आहेत.दळण वळण विकसित करण्यासाठी पाणंद रस्ते चांगले पाहिजेत.शासना मार्फत राज्यात १२ कोटी पाणंद रस्ते करण्याचा निर्धार केला आहे.त्या रस्त्यांची इतर हक्कात नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे या पाणंद रस्त्या बाबत आता लोकांच्यात अडचणी व तंटे निर्माण होणार नाहीत.कुणबी दाखल्यांचा शिराळा व वाळवा तालुक्यात चांगल्या प्रकारे निपटारा झाला आहे.येथे मोडीलिपीचे चांगले रेकॉर्ड केले असून त्याचा मराठीत अनुवाद केला आहे.त्याचा चांगला उपयोग या ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे.सामान्य माणसाच्या अडिअडचणीचे चांगल्या प्रकारे निराकारण करा.रेशन कार्डच्या बारा अंकी कोडला काही अडचणी येत असतील तर लोकांना गरजेवेळी प्रमाणपत्र देऊन सहकार्य करा.तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारा.
प्रारंभी तहसिल कार्यालय शिराळा व "नातं रक्ताचं" परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्यने तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
स्वागत प्रास्ताविक तहसीलदार शामला खोत पाटील यांनी केले. यावेळी गुणवंत अधिकारी,कर्मचारी व निवृत्त निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी यांचा आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार शामला खोत- पाटील,निवासी नायब तहसीलदार अस्लम जमादार,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,महसूल नायब राजेंद्र पाटील,संजय गांधी योजना नायब तहसीलदार राजाराम शिद,पुरवठा निरीक्षक शारदा रेळे,मंडल अधिकारी बालम मुलाणी,लिना पाटील,सुजाता काटकर,दत्तात्रय मोठे,सुरेश शेळके,दीपाली पाटील,उमेश माळी,संजय देवकर,विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी,मनोज जाधव,सुमित्रा खामकर,माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील,रणजितसिंह नाईक,के.डी.पाटील,सम्राट शिंदे,तानाजी कुंभार,जगदीश कदम,नाटोली सरपंच तानाजी पाटील उपस्थित होते.आभार अस्लम जमादार यांनी मानले.
0 Comments