शिराळा,ता.१०:शेडगेवाडी( ता.शिराळा )येथे छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य दारूबंदी जन आंदोलन व व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच आणि दारूबंदी संघर्ष समिती यांच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने देशी दारू दुकान व बिअर बार यांच्या विरोधातील आंदोलन करून महिलांनी व्यसनाची होळी केली.
यावेळी कॉंग्रेसचे शिराळा तालुकाध्यक्ष ॲड. रवी पाटील म्हणाले, देशात सुरू असलेली हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी रस्त्यावर उतरू. गुजरात राज्यामध्ये दारू बंदी असेल तर महाराष्ट्रात का नाही याचा जाब या सरकारला विचाला पाहिजे.
सुनील घोलप म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. मात्र दुसरीकडे दारू दुकाने परवाने देण्याकडे हे सरकार व्यस्त आहे.
पोपट बनसोडे म्हणाले, महिलांसाठी दारूबंदी चळवळीचे व्यासपीठ महिलांसाठी तयार केले आहे. दारूबंदी चळवळ गतिमान करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा.
यावेळी व्यसनाची होळी महिलांच्या हस्ते करण्यात आली
यावेळी शशिकला शेळके ,नानासाहेब कांबळे, बाजीराव कदम, दिपाली कांबळे, शारदा पाटील, दीपक कांबळे, नामदेव झिमुर, सुवर्णा ढेकळे, विनोद नाईक, गोरख माने, कृष्णा कांबळे ,सुरेखा भाटे, चंद्रकांत बाबर, सुरेश कांबळे उपस्थित होते. यावेळी कोकरूड पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments