शिराळा ता.२ ऑगस्ट २०२५ :येथे ११ मारुती पैकी एक समर्थ रामदास स्वामी स्थापित वीर हनुमान मंदिर आहे. येथे आज श्रावणातील दुसरा शनिवार असल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, व इतर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी ११ हनुमान पैकी एक असणाऱ्या वीर हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शिराळा येथे शके १५७६ सन १६५५ ला म्हणजे सुमारे ३६८ वर्षा पूर्वी या मंदिराची उभारणी समर्थ रामदास स्वामी यांनी केली आहे. ही मूर्ती चुनखडी,शाडू,गोमुत्र, गाईचे शेण यापासून बनवलेली आहे. अकरा मारुती पैकी एक मारुती मंदिर शिराळ्यात असल्याने आज महिलांची मोठी गर्दी होती.अकरा मारुती दर्शनासाठी शिराळा आगाराने सहा एसटी बसेस सोडल्या असून सांगली,सातारा, कोल्हापूर ब इतर जिल्ह्यातून विविध आगारांच्या एसटी बसेस,खासगी आरामदायी गाड्या शिराळ्यात दाखल झाल्या होत्या. मोटरसायकलसह इतर खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिराळ्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्याने देवदर्शनासाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे एसटी उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या भाविकांच्या मुळे मंदिर परिसरात असणाऱ्या नारळ,चिरमुरे,लाडू ,रुईची पाने ,तेल,कापूर ,अगरबत्ती विक्रेत्या छोट्या छोट्या व्यवसायिकांना चांगले उत्पन्न मिळत आहेत.
0 Comments