BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नगरपंचायतसाठी हवे जुने तहसीलदार कार्यालय

 


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

शिराळा हे तालुक्याचे ठिकाण आहे.२०१६ ला ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली .मात्र ९ वर्षे झाली अद्याप त्याच ग्रामपंचायत कार्यालयाच्या अपुऱ्या जागेत नगरपंचायतचा कारभार सुरु आहे. अधिकारी व विविध  विभागाचे सुमारे ६० कर्मचारी काम करत आहेत.त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या नगरपंचायतला सुसज्य अशा इमारतीची प्रतीक्षा आहे. जागे अभावी ही इमारतीचे घोंगडे भिजत पडले आहे.  त्यामुळे शिराळच्या  प्रशासकीय इमारती जवळ असणारे जुने तहसीलदार कार्यालयाची  इमारत नगरपंचायतसाठी दिली तर एक भव्य नगरपंचायत कार्यालय सुरु होईल.एकाचा ठिकाणी शिराळा शहर व तालुक्यातील लोकांना शासकीय सुविधा मिळतील.त्यामुळे ही जुन्या तहसीलदार कार्यालायची जागा नगरपंचायतसाठी हस्तांतरीत करावी अशी नागरिकांची मागणी आहे.  

शिराळा शहराचा विस्तार सध्या वेगाने  होत आहे.विविध कारणाने व प्रशासकीय कामानिमित्त शिराळा शहरात व नगरपंचायती मध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. शिराळा शहरात नगरपंचायतचे असणारे कार्यालय अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आहे. त्याठिकाणी येणाऱ्या लोकांच्यासाठी व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नाही. अनेकवेळा वाहने रस्त्या कडेला लावली जात असल्याने  नेहमी वाहतूक कोंडी होत असते.याचा मोठा त्रास वाहनधारकांना होत असतो. नगरपंचायती मधील कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांना दीड ते दोन किमी अंतरावर असणाऱ्या प्रशासकीय कार्यालयात जावे लागते. त्यामुळे लोकांच्या वेळेचा अपव्य होत असतो.वृद्धाना चालता येत नसल्याने रिक्षा शिवाय पर्याय नसतो.तहसीलदार कार्यालयातील कागदपत्रे घेवून पुन्हा गावात नगरपंचायत मध्ये यावे लागते. 


प्रशासकीय इमारती लगतच एका बाजूस पंचायत समिती कार्यालय, न्यायालय इमारत  तर दुसऱ्या बाजूस भूमिअभिलेख कार्यालय व शिराळा पोलीस ठाणे आहे.पंचायत समिती व प्रशाकीय कार्यालयाच्या मध्येच जुने  ब्रिटीश कालीन तहसीलदार कार्यालय इमारत आहे.त्याचा सध्या मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयासाठी उपयोग केला जात आहे. ही इमारत सुस्थिती असल्यामुळे विना खर्चाची चांगली इमारत नगरपंचायतसाठी उपलब्ध होऊ शकते. तशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्याकडे केली आहे. ही इमारत नगरपंचायतला मिळाली तर सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली येऊन लोकांचा एकाचा ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा मिळतील. नगरपंचायत कर्मचारी व अधिकारी यांना स्वतंत्र विभागनिहाय जागा मिळून त्यांना चांगल्या वातावरणात काम करण्याची संधी मिळेल. याच ठिकाणी सभागृह असल्याने विविध कार्यक्रम घेणे सोयीस्कर होईल.     


 

शिराळा नगरपंचायतीचे कार्यालय शिराळा शहरातील जुन्या तहसीलदार कार्यालयात स्थलांतरित झाले तर  सर्वच शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन नागरिकांची मोठी सोय होईल. लोकांच्या वेळेची बचत होईल. सदरची जागा प्रशस्त असल्याने पार्किंग व  शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल.

वसंत कांबळे (नागरिक)


शिराळा नगरपंचायत प्रशासकीय इमारतीसाठी प्रशस्त जागा आवश्यक आहे.प्रशासनासाठी अपुरी पडणारी जागा, वाढते शहरीकरण, मूलभूत सुविधा, फायर ब्रिगेड, बैठक हॉल, पार्किंग अन्य प्रशासकीय सोयीसाठी  शिराळा तहसीलदार कार्यालयाची जुनी इमारत अथवा अन्य मोठी जागा मिळाल्यास ते सोयीचे होणार आहे.

ॲड. सम्राट  शिंदे (ग्रामस्थ)

Post a Comment

0 Comments