शिराळा, ता.९: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार,शिराळा तालुक्यातील पदवीधर आणि शिक्षक घटकांसाठी मतदार यादी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा उद्देश विधान परिषद निवडणुकीसाठी पात्र मतदारांची यादी अचूक आणि अद्ययावत करणे आहे. यासाठी अधिकाधिक पात्र व्यक्तींनी नोंदणी करावी असे आवाहन तहसीलदार शामला खोत पाटील यांनी केले आहे.
यावेळी खोत म्हणाल्या, मतदार नोंदणीसाठी पदवीधर मतदार,१ नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी पदवी पूर्ण असावी,मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असे निकष आहेत.यासाठी पदवी प्रमाणपत्र, ओळखपत्र आधार कार्ड/पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा.महिला मतदारां करीता नावात बदल असल्यास पॅन कार्ड किंवा राजपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.
शिक्षक मतदारासाठी १ नोव्हेंबर २०२५ रोजी माध्यमिक शाळा (किमान ७वी ते १०वी) किंवा उच्च माध्यमिक शाळेत किमान ३ वर्षे शिक्षक म्हणून सलग सेवा पूर्ण केलेले शिक्षक,.पूर्णवेळ शिक्षक असणे आवश्यक (अंशकालीन शिक्षक अपात्र). आहे.यासाठी शाळेचे सेवा प्रमाणपत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा अशी आवश्यक कागदपत्रे हवीत. नोंदणी साठी क्यू आर कोड स्कॅन करून नोंदणी करता येईल"यासाठी शिराळा तालुका निवडणूक कार्यालय ,तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा .पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे. चुकीच्या किंवा अपूर्ण नोंदणीमुळे मतदानाचा हक्क गमावू नये, यासाठी तात्काळ नोंदणी करा. स्थानिक प्रशासन, शिक्षण संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन तहसीलदार खोत यांनी केले आहे..
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .
0 Comments