शिराळा,ता.७:मुळीकवाडी(ता.शिराळा)येथील चार वर्षीय बालक आरव अमोल मुळीक याच्या वर बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (ता.७)वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.त्या परिसरात बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी चार ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.त्या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.रात्री गावात वन विभागामार्फत बिबट्या संदर्भात जनजागृती व प्रबोधन सुरु आहे.जखमी आरव ची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार कराड येथील खाजगी रुग्णालयात सुरू आहेत.
गिरजवडे पैकी मुळीकवाडी(ता.शिराळा) येथील शेतकरी बजरंग मुळीक हे आपला नातू आरव सोबत गाडीमळा शेजारी असणाऱ्या पाचिरोपाडा येथे जनावरांसाठी गवत व उसाचा पाला आणण्यासाठी गेले होते.त्यावेळी झाडामागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने आरव वर हल्ला करून त्यास ऊसाच्या फडात फरफटत नेले.आपल्या शेजारी आरव नसल्याचे आजोबा बजरंग मुळीक यांच्या लक्षात आले.त्यांनी ग्रामस्थ काशिनाथ मुळीक यांना याबाबत मोबाईलवरून माहिती दिली.बजरंग व त्यांच्या सोबत असणाऱ्या शोभा मुळीक,राजश्री मुळीक यांनी उसात शोध सुरु केला असता त्या ठिकाणी आलेल्या काशिनाथ यांना आरवला बिबट्या उसात घेऊन गेल्याचे दिसले.त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या तावडीतून आरवाची सुटका केली.त्याचवेळी घाबरलेल्या बिबट्याने आरवला ऊसात टाकून धूम ठोकली.त्याच्या गळ्यावर छातीवर बिबट्याने १७ ठिकाणी ओरबडले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आज मुळीकवाडी परिसरात वनविभागाने पाहणी केली.तिथे बिबट्याचा अधिवास जाणवून आला असून पायाचे अनेक ठसे आढळून आले आहेत.या घटनास्थळी व त्या परिसरात वनविभागाने चार ट्रॅप कॅमेरे बसवले असून रात्रंदिवस कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना बिबट्या विषयी मार्गदर्शन आणि समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वनविभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे.वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी,वनपाल अनिल वाजे,वनरक्षक स्वाती कोकरे,दत्तात्रय शिंदे,वनसेवक आदिक शेटके,दादा शेटके,नामदेव शिद,गौरव पाटील,अक्षय ढोकळे,संजय पाटील,सचिन पाटील राहुल पाटील,विशाल पाटील,सरपंच सचिन देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments