शिराळा, ता. १७ : दुध आणण्यासाठी गेलेल्या राजस्थानातील युवकाचा नाथ मंदिरा शेजारील मोरणा नदीवरील पुलावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. रवि सोपाराम देवासी (वय २०, रा. गोलणा( ता. जसवंतपुरा, जिल्हा जालोर, राज्य राजस्थान) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. याबाबत कापड दुकानदार जेमताराम देवसी यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि देवासी हा गेल्या सहा महिन्यांपासून शिराळा येथे जेमताराम रणराम देवसी यांच्या कापड दुकानात काम करत होता. तो दररोजप्रमाणे सकाळी दुध आणण्यासाठी श्री गोरक्षनाथ मंदिराच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाला होता. मोरणा नदीवरील पुलाजवळ मोटारसायकल संरक्षक कठड्याला जाऊन धडकली. या धडकेत रवि हा गाडीवरून खाली पडला व गंभीर जखमी झाला.घटनास्थळाजवळील नागरिकांनी तत्काळ कापड दुकानदार जेमताराम देवसी यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रवि हा रक्तस्त्रावामुळे जागीच मृतावस्थेत असल्याचे आढळले. पुढील प्रक्रिया पूर्ण करून रवि देवासी याचा मृतदेह मूळ गावी राजस्थान येथे रवाना करण्यात आला असून तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.या अपघाताची नोंद शिराळा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप ठोंबरे करत आहेत.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments