BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जावईबापूंच्या प्रचारात आता तूर्त पक्ष बाजूला ठेवून उतरले सासरेबुवा

  



शिराळा,ता.१५:नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या जावयाच्या उमेदवारीला मजबूत पाठबळ देण्यासाठी सासऱ्यांनी स्वतःचा पक्ष तात्पुरता बाजूला ठेवत थेट प्रचाराच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.कौटुंबिक नातेसंबंध आणि स्थानिक राजकारणाचा समतोल साधत सासरे विश्वास कदम स्वतः जावयासाठी घराघरात भेटीगाठी घेऊन मतदारांशी संवाद साधणार आहेत.त्यामुळे या निवडणुकीत ‘कुटुंब विरुद्ध पक्ष’ असा वेगळाच राजकीय रंग शिराळा नगरपंचायत निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. याची कबुली सासऱ्यांनी आपल्या नेत्यांची परवानगी काढून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.यामुळे स्थानिक राजकारणात नवीच चर्चा रंगू लागली आहे. 

शिराळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते  व विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,पृथ्वीसिंग नाईक हे माझे जावई आहेत.ते शिवसेना(शिंदे गट) महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून शिराळा नगरपंचायतची निवडणूक लढवत आहेत.याबाबत मी आमचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते,माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी चर्चा केली असून नगरपंचायत निवडणुकीपुरताच  माझा हा निर्णय आल्याचे देखील मी त्यांना सांगितले आहे. आत्ता होणाऱ्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीपुरता माझा हा निर्णय झालेला आहे.जावई म्हणून पृथ्वीसिंग नाईक यांना पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य असल्याने मी व माझ्या कुटुंबातील सर्वजण पृथ्वीसिंग नाईक यांच्या प्रचारात सक्रिय असणार आहे.त्यात पुढे म्हटले आहे,२०१३ पासून आज पर्यंत मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.त्यांनी दिलेली जबाबदारी मी नेहमीच प्रामाणिकपणे पार पाडली आहे.नगरपंचायत निवडणुकीनंतर देखील मी मानसिंगराव नाईक यांच्या विचारानेच काम करणार आहे.घरगुती नातेसंबंध असल्याने या निवडणुकीपुरता माझा हा निर्णय असेल.कदम यांच्या  या निर्णयाने शिराळा नगरपंचायत निवडणुकीत वेगळा राजकीय रंग भरला असून त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला या त्यांच्या भूमिकेमुळे  पूर्णविराम मिळाला आहे. 

दोन वर्षा पुर्वी शिराळा नगरपंचायतचे पहिले आरक्षण सर्वसाधारण पडले होते.तेव्हा विश्वास कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)पक्षातून नगराध्यक्षपदासाठी प्रमुख इच्छुक होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्या  मुलीचा विवाह  पृथ्वीसिंग नाईक यांच्याशी झाला.पृथ्वीसिंग नाईक हे ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. पुन्हा आता दोन महिन्या फेर आरक्षण ही सर्वसाधारण पडले.त्यामुळे जावयासाठी सासऱ्यांनी माघार घेतली.आता तर तात्पुरता पक्षीय विचार बाजूला ठेवून जावयाच्या प्रचारात कुटुंबासह  सक्रिय झाले.



व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments