मुंबई, ता. १४: उमेदवारी अर्ज शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) या दोन्ही सुट्टीच्या दिवशीही दुपारी तीनपर्यंत स्वीकारण्यात येतील. उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेही उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी देखील अर्ज स्वीकारण्याचा आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने इच्छुक उमेदवारांची शेवटच्या क्षणी होणारी धावपळ व दमछाक बंद होणार आहे.त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठीआणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाइन पद्धतीनेसुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.
उमेदवारी अर्ज शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) या दोन्ही सुट्टीच्या दिवशीही दुपारी तीनपर्यंत स्वीकारण्यात येतील. उमेदवारी अर्ज व शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
---
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments