BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांच्या पत्नी अन् मुलीलाही कोरोनाची लागण


त्यांच्या पत्नी अन् मुलीलाही कोरोनाची लागण

मुंबई: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या पत्नी व मुलीला ही कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्यावर अंधेरी येथे उपचार सुरू आहेत.
शनिवारी १५ मे रोजी कोरोनामुळे शाहूनगर पोलीस ठाणे(मुंबई) येथे कार्यरत असणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. ते घरीच असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीची कोरोना चाचणी घेण्यात आली.त्यात त्यांचा ही  कोरोना चाचणी अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. त्या दोघींना अंधेरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुलकर्णी यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस सहकारी व इतर लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. अमोल कुलकर्णी यांचा झालेला मृत्यू, त्यांच्या पत्नी व मुलीचा कोरोना पॉझिटिव्ह असलेला अहवाल या मुळे पोलीस प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. या शाहूनगर  पोलीस ठाण्यात आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती.त्यात कुलकर्णी यांच्या समावेश होता. त्यामध्ये कुलकर्णी यांच्या मृत्यू झाल्याने कर्मचारी हादरले आहेत.कुलकर्णी शिराळा येथील असल्याने त्यांच्या मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.या कोरोनच्या संकटातून त्यांच्या पत्नी व मुलीची लवकर सुटका व्हावी अशी प्रार्थना केली जात आहे.

Post a Comment

0 Comments