BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी केली कोरोनावर मात


करुंगली व मोहरेकरांना दिलासा; त्या दोघांनी केली कोरोनावर मात

शिराळा ता.४:  मोहरे ( ता.शिराळा) येथील मृत झालेल्या कोरोनाबाधित रूग्णाच्या मोठ्या भावाने व करुंगली येथील तरुणाने आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे करुंगली व मोहरेकरांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
           मोहरे येथील ते कुटुंब  मुबई येथे होते. लॉक डाऊन सूरू झाल्याने व मुंबई येथे रुग्ण वाढत असल्याने ते मुंबईहून गावी येऊन होम क्वारंटाईन झाले होते. त्यांवेळी  बुधवारी २० मे रोजी  ५० वर्षीय पुरुषाला त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते.त्यांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी २१ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील १४ जणांना शिराळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ यांची कोरोनाची चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आले होते. या लहान भावावर उपचार सुरू होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी २७मे रोजी त्यांचे निधन झाले होते.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते. मात्र त्याच्या मोठ्या भावाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाला आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
        करुंगली येथील मुंबईहून आलेल्या ३३वर्षीय  कोरोना बाधित युवक आज कोरोन मुक्त झाला आहे.
सदर युवक मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन झाला होता. त्यास त्रास जाणवू होऊ लागल्याने  मिररज येथे पाठवण्यात आले होते.त्या ठिकाणी कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील १३ जणांना शिराळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृह संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.  मात्र तो आज कोरोना मुक्त झाला आहे.

Post a Comment

0 Comments