BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत अतिवृष्टी; आठ तासात ७५मी.मी.पाऊस

 मणदूर ते चांदोली धरण दरम्यान मुख्य रस्त्यावर उन्मळून पडलेले झाड

चांदोलीत अतिवृष्टी; आठ तासात ७५मी.मी.पाऊस

शिराळा, ता.३:कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात मान्सूनची दमदार एन्ट्री झाल्याने बळीराजा सुखावला आहे. चांदोली धरण परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यंत आठ तासात ७५ मी.मी.पावसाची नोंद झाली असल्याने या परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
पहाटे पासून पावसाची संततधार कायम सुरू आहे. मृग नक्षत्रापूर्वीच पावसाने दमदार सुरवात केल्याने लोकांच्या गतवर्षाच्या महापुराच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आहेत.
 शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एप्रिल आणि मे महिन्यात पाचवेळा वळीवच्या पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे पेरणीपर्व मशागततीच्या कामांना गती मिळाली. तालुक्यात धुळवापेवर भातपेरणी अंतिम टप्यात आली आहे. गेले दोन दिवस पावसाची रिमझिम सुरु होती. मात्र आज बुधवारी पहाटे पासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. हा पाऊस भात उगवणीस उपयुक्त आहे. ऊस पिकाला ही पाण्याची गरज होती.  लोकांनी भाताचे तरु पेरण्यास सुरवात केली आहे.  आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मणदूर ते चांदोली धरण दरम्यान मुख्य रस्त्यावर  झाड उन्मळून पडल्याने कर्मचाऱ्यांना धरणावर जाण्यास काही तास अडचण निर्माण झाली होती. सायंकाळी झाड तोडून वाट रस्ता मोकळा करण्यात आला.
शिराळा मंडल निहाय पाऊस
शिराळा तालुक्यातील २४ तासातील मंडल निहाय  पाऊस(मी.मी.मध्ये)
 शिराळा १७,कोकरूड,१३मांगले २६,शिरशी २१, सागाव २०,चरण ३० वारणावती १५ 

Post a Comment

0 Comments