शिराळा,ता.२२: पेठ नाका ते चांदोली या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन प्रेस क्लब आँफ शिराळा यांच्यावतीने आमदार मानसिंगराव नाईक यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटलं आहे . पेठ नाका ते चांदोली या रस्त्याचे काम पूर्ण होत आले असून रुंदीकरणामुळे कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या किंबहूना पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांना मुकरबखानाने कैद केल्यानंतर संगमेश्वर पासून बहाद्दूर गडाकडे नेत असताना त्यांना शिराळा मार्गे आणण्यात आले होते. हा इतिहास लक्षात घेऊन पेठ नाका ते चांदोली या मार्गाला छत्रपती संभाजी महाराज मार्ग असे नाव देण्यात यावे. यामुळे त्यांच्या शौर्य स्मृती यानिमित्ताने नेहमीच या मार्गावरती प्रवास करणाऱ्या लोकांच्या चिरंतन स्मरणात राहतील.
यावेळी प्रेस क्लब आँफ शिराळाचे अध्यक्ष विनायक गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश हसबनीस, उपाध्यक्ष विकास शहा, विठ्ठल नलवडे, सचिव शिवाजीराव चौगुले, कार्यकारी सदस्य प्रितम निकम, अजित महाजन उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments