BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येथे लावले चांदोलीचे दिशादर्शक फलक

 






शिराळा: शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य येथे. याचे दिशादर्शक फलक आशियायी महामार्गावर लावण्यात यावेत म्हणून प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या वतीने खासदार धैर्यशील माने, मुख्य वन संरक्षक समाधान चव्हाण व आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.

या मागणीनुसार कराड येथील पाचवड फाट्याजवळ व पेठ नाका येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प दिशा दर्शक फलक लावण्यात आले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व चांदोली अभयारण्य येथे भेट देण्याकरता  दरवर्षी हाजारो पर्यटक येतात. मात्र आशियायी महामार्गावर कराड पासून पेठ नाक्या पर्यंत कुठेही यापूर्वी दिशा दर्शक फलक लावण्यात आले नव्हते. सदरची बाब प्रेस क्लब ऑफ शिराळा यांनी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार निवेदनही देण्यात आले. यावर सकारात्मक निर्णय घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गावर हे फलक लावण्यात आले आहेत. 


     

याबाबत प्रेस क्लब ऑफ शिराळाचे अध्यक्ष विनायक गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश हसबनीस, उपाध्यक्ष प्राचार्य विठ्ठ्ल नलवडे, विकास शहा, सचिव डॉ. शिवाजीराव चौगुले, कार्यकारी सदस्य अजित महाजन, प्रितम निकम यांनी  पदाधिकारी व अधिकारी यांना धन्यवाद दिले.


Post a Comment

0 Comments