BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

घरात घुसणाऱ्या बिबट्याला पती पत्नीने धाडसाने हुसकावले

 


शिराळा,ता.१३:गिरजवडे पैकी मुळीकवाडी(ता.शिराळा)येथे अमोल बजरंग मुळीक यांच्या घरात भर दुपारी दोन वाजता मोडलेल्या दरवाज्याच्या फटी मधून आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याच्या बछड्यास बजरंग मुळीक व शोभा मुळीक या पतिपत्नीने धाडसने हुसकावले.दिवसा बिबट्याचा वावर गावात होऊ लागल्याने गावातील लोकांनी बिबट्याची धास्ती घेतली आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,काल शुक्रवारी (ता.१२)रोजी गिरजवडे पैकी मुळीकवाडी येथील अमोल मुळीक यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस बिबट्याची दोन बछडी आली होती.त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस ऊस आहे.मागील बाजूचा घराचा दरवाजा थोडा मोडलेला असल्याने त्यास फट पडली आहे.शोभा मुळीक ह्या शिरशी येथून आठवडा बाजार करून आल्या.आणलेला भाजीपाला निवडत असताना पाठीमागील दरवाजाच्या फटी मधून काहीतरी आता तोंड घालत असल्याचे जाणवले.त्यांना ते मांजर असावे असा अंदाज वाटल्याने त्यांनी दरवाज्या जवळ जाऊन पाहिले असता ते बिबट्याचे बछडे असल्याचे दिसले.त्यावेळी त्यांनी पती बजरंग यांना हाक मारली.त्यांनी आरडाओरडा करून त्यास हुसकावले.तर दुसरे बछडे पाठीमागे उसाच्या शेताजवळ उभे होते.आरडाओरडा केल्याने दोन्ही बछड्यानी उसात धूम ठोकली.याबाबत वन विभागास कळवलं असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

तर काल शुक्रवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास शरद पाटील यांच्या गायमुख परिसरातील वस्तीवर दुध गाडी चालक सुभाष पाटील यांना तर गणेश मुळीक हे रात्री नऊ वाजता शिरशी कडून येत असताना त्यांना बछड्यासह बिबट्याचे दर्शन झाले.त्यांनी गावात शरद पाटील व इतर नागरिकांना फोन करून माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगितले.

दोन दिवसा पुर्वी शिवरवाडी येथील घरकुलाचे काम सुरु असलेल्या घरात बिबट्या बसला होता.त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी पाईप आण्यासाठी गेलेल्या नाथा बेंद्रे यांना दिसला.घराला दरवाजे नसल्याने त्यांनी आपले बंधू व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही चौकटीला पत्रे लावून बिबट्यास कोंडून ठेवले होते.त्यानंतर रेस्क्यू पथक व वन विभाग यांनी त्यास जेरबंद केले होते.

कोट-

शिरशी येथे आठवडा बाजार करून घरी आले.बाजारातून आणलेला भाजीपाला निवडतं असताना मागील दरवाजाच्या फटीमधून काहीतरी आत तोंड घालत असल्याचे लक्षात आले. मला वाटलं मांजर असावे म्हूणन दरवाज्याच्या जवळ जाऊन पाहिलं असता ते बिबट्याचे बछड होतं.मालकांना बोलावून आम्ही त्यास हुसकावले.दुपारची वेळ असल्याने शेजारी कोणी ही नव्हते.

शोभा मुळीक (प्रत्यक्षदर्शनी)

चौकट-ज्या मुलावर बिबट्याने हल्ला केला त्याच्याच घरात घुसण्याचा प्रयत्न

 ६ऑक्टोबर २०२५ रोजी याचं घरातील आजोबा सोबत शेतात गेलेल्या आरव अमोल मुळीक या चार वर्षाच्या बालकावर  बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.त्यांच्याच घरात थेट बिबट्याने घुसण्याचा प्रयत्न केला.हा एक योगायोग असला तरी या घटनेने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

कोट-गावात बिबट्याचा वावर वाढला आहे.माणसं व पाळीव प्राण्यावर हल्ले होतं असल्याने वन विभागाने योग्य ती उपाययोजना करून बिबटयाचा बंदोबस्त करावा.

सचिन देसाई (सरपंच)

कोट-

मुळीक यांच्या घराच्या आजूबाजूला उसाचे क्षेत्र आहे.शिवाय त्यांच्या कोंबड्या आहेत.त्यामुळे त्यांना लपण्यासाठी जागा असल्याने व भक्षाच्या शोधात बिबट्याची बछडी आली असावीत.आम्ही त्या परिसरातील ऊस तोडण्यासाठी सांगितले आहे.

स्वाती कोकरे (वनरक्षक)





व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments