BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उसाचा पाला पेटवताना एका भावाचा होरपळून मृत्यू तर दुसरा भाजून गंभीर जखमी

 


शिराळा,ता.१४:वाकुर्डे बुद्रुक पैकी मानेवाडी (ता.शिराळा) येथील आनंदा मोरे व वसंत  मोरे हे  दोन सख्खे भाऊ उसाचा फड पेटण्यासाठी काल शनिवारी  गेले असता ऊसाचा वाळलेला पाला पेठविल्याने त्याची आग आजूबाजूच्या शेताला लागेल या भितीने आग विझवित असताना आगीत सापडून आनंदा रामचंद्र मोरे (वय ७० ) यांचा भाजून मृत्यू झाला तर वसंत रामचंद्र मोरे (वय ७५ )  हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत मयत आनंदाचा लहान भाऊ   शरद रामचंद्र मोरे (वय ६० )  यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी (ता.१३ ) रोजी सायकाळी ६  ते आज रविवारी ता.१४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली .

याबाबत घटनास्थळ व शिराळा पोलिसातून समजलेली माहिती अशी,काल शनिवारी( ता.१३)रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास  आनंदा व वसंत  हे दोघे भाऊ शिरशी रस्त्यावरील बामणकीच्या शेतात उसाचा फड पेठवण्यासाठी  गेले होते. त्यांनी फडातील उसाच्या पाला  पेठवला असता थोड्या वेळात वाऱ्याच्या झोत वाढल्याने अगीने क्षणात रौद्ररूप धारण केले.त्यावेळी फडाच्या दक्षिणेला वसंत  तर उत्तरेला आनंदा होते.प्रचंड वारे सुरु झाल्याने क्षणार्धात आगीची झळ वसंत यांना लागल्याने ते खाली बेशुद्ध पडले.त्यावेळी शेताजवळ असलेल्या गोरख  माने व इतर महिलांनी  भाजून जखमी झालेल्या वसंत यांना गोरखा यांच्या घरी आणून  पाणी पाजले .त्यांच्या  गावात असणारे  मेहुणे सुनील माने यांना माहिती दिली.त्यांनी वसंत यांना मोटारसायकल वरून घरी सोडले. सुनील माने, श्रीरंग माने,अमोल  माने यांनी उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी जखमी वसंत यांनी रात्री बारा वाजे पर्यंत  घरी फोन करून आनंदा आलेत का चौकशी केली मात्र ते घरी आले नव्हते.इतर लहान भाऊ शरद यांनी ही नातेवाईक व पै पाहुणे यांच्याकडे चौकशी केली मात्र त्यांच्याकडे ते गेले नसल्याचे त्यांनी सांगितले सकाळ पर्यंत वाट पाहून ते सकाळी न आल्याने लहान भाऊ शरद व भाचा विजय माने यांनी त्या परीसारतील विहिरीची पाहणी केली.शेवटी फड पेटवलेल्या उसाच्या फडाकडे जाऊन पाहिले असता रस्त्या कडेला आनंदाची सायकल आढळून आली. शेजारील जळलेल्या उसाच्या फडात त्याचा  अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.पुढील तपास पोलीस हवलदार सुनील पेठकर करत आहेत.

तु पायवाटेने जा मी सायकलवरून येतो 

आनंदाला  मुलबाळ नाही.आजारामुळे चार वर्षापूर्वी त्याची पत्नी सखुबाई हिचे निधन झाले.त्यामुळे तो माझ्या जवळच राहत होता.तो नेहमी सायकल वापरतो .त्यामुळे फड पेटवायला जात असताना त्याने  फड पेटवून झाल्या नंतर तु पायवाटेने जा,मी सायकलवरून येतो असे म्हणाला.एवढेच शेवटचं बोलण आमच्या भावामध्ये झाले. रात्रीपासून आम्हा भावावाची ताटातूट झाली असे म्हणून वसंत यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत  शवविच्छेदनासाठी आणलेल्या आनंदाच्या मृतदेहाकडे पाहून अश्रू ढाळले .

मृतदेह रात्रभर उसाच्या फडात  

वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे  मोरे यांच्या फडात पेटवलेल्या पाल्याची आग शेजाऱ्याचा उसाच्या फाडला  लागली. त्या भीती पोटी आनंदा घरी आले नसतील असा गैरसमाज घरच्या लोकांचा झाला.त्यामुळे तो सकाळी येईल असे वाटले.मात्र सकाळी ही न आल्याने त्यांचा ऊसाच्या फडात शोध घेतला असता अर्धवट जळलेल्या अवस्थेत त्याच्या  मृतदेह आढळून आला.


व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....





View this post on Instagram

A post shared by shivaji chougule (@shivajichougule91)


आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .



  


Post a Comment

0 Comments