सांगली, : जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 75.96 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर 2025 ऐवजी सुधारीत निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान ८३.०८ शिराळ्यात तर सर्वात कमी मतदान तासगावात ७०.७६ टक्के झाले.
जिल्ह्यातील उरूण -ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नगरपरिषद /नगरपंचायतनिहाय एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी पुढीलप्रमाणे.
उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 64215 पैकी 47608, 74.14 टक्के,
विटा नगरपरिषद - 46332 पैकी 36770, 79.36 टक्के,
आष्टा नगरपरिषद - 30573 पैकी 22856, 74.76 टक्के,
तासगाव नगरपरिषद – 32994 पैकी 23249, 70.46 टक्के,
जत नगरपरिषद – 28090 पैकी 20464, 72.85 टक्के,
पलूस नगरपरिषद – 22067 पैकी 17716, 80.28 टक्के,
शिराळा नगरपंचायत – 13095 पैकी 10879, 83.08 टक्के,
आटपाडी नगरपंचायत – 20611 पैकी 16410, 79.62 टक्के.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सह आयुक्त नगरप्रशासन दत्तात्रय लांघी, डॉ. पवन म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील 6 नगरपरिषद व 2 नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तैनात चोख पोलीस बंदोबस्तामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली. आठही नगरपरिषद / नगरपंचायतींमध्ये काल मंगळवार सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष सोय करण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. विशेष मतदान केंद्रे तसेच गुलाबी मतदान केंद्रे सजविण्यात आली होती.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments