BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकरुडात छायाचित्रकारांचा श्री चिंचेश्वर वाचनालय, पत्रकार संघातर्फे सत्कार

 

कोकरुड, ता.२० : येथे 'जागतिक छायाचित्रकार' दिनाच्या निमित्ताने  छायाचित्रकारांचा श्री चिंचेंश्वर वाचनालयय (मांगरुळ ), शिराळा तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने जेष्ठ छायाचित्रकार बसीर मुल्ला, बाजीराव  शेळके, मारुती कांबळे, राजू मोरे, सचिन मोहिते, विकास पाटील, भगवान मोहिते, प्रशांत पोतदार यांचा सत्कार फेटा,नारळ यांच्यासह श्री चिंचेंश्वर वाचनालयाने वाचनालय राबवत असलेल्या वृक्ष संवर्धन संकल्पनेअंतर्गत वृक्ष भेटिने सन्मान केला.  

         छायाचित्रकार सचिन मोहिते, विकास पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या स्वागत, प्रास्ताविकाबरोबर सुत्रसंचालन हिंम्मतराव नायकवडी यांनी केले. शेवटी आभार पत्रकार प्रतापराव शिंदे यांनी मानले. आम्हा छायाचित्रकारांकडे समाजाच्या नजरा एक व्यवसाईक म्हणून असल्या तरी  आमच्या छायांकनाच्या माध्यमातून आम्ही समाजाशी एक नाळ जोडणारा असाच आम्ही सर्वजण घटक आहोत. वाचनालयाने, पत्रकार संघाने आमचा केलेला सन्मान आम्हाला समाजाशी घट्ट बांधीलकी जपणारा संदेश देणाराच असल्याच्या प्रतिक्रिया सर्व छायाचित्रकारांनी दिल्या.



Post a Comment

0 Comments