BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दोन घरात २५ आणि ५५ वर्षाने झाले लेकीचे आगमन म्हणून केला आनंदोत्सव

 

शिराळा: शिराळा येथे २५  तर कडेगाव येथे ५५ वर्षांनीं घरात मुलगी जन्माला आल्याने शिराळच्या सूर्यकांत शहा व कडेगावच्या फुलचंद शहा या दोन्ही घराण्यात दोन्ही मुलींचे आगळ्यावेगळ्या स्वरूपात स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला.

  प्रणाली व पार्थ (शिराळा) आणि निखिल व मनाली ( कडेगाव) या शहा कुटुंबातील दोघांनाही मुलगी झाली. शिराळा च्या कुटुंबात २५ तर कडेगाव च्या कुटुंबात ५५ वर्षांनी मुलगी झाली. त्यांना  शिराळा व कडेगाव या गावी आणण्यात आले.  त्यासाठी घरापासून चाळीस ते पन्नास फूट फुलांची चादर करण्यात आली होती. स्वागताचे फलक लावण्यात आले होते. वीस - पंचवीस लहान मुलांच्या समवेत तिला घरी आणण्यात आले . तांदळाचा तांब्या ओलांडून तसेच कुंकवाच्या पाऊलानी तिचा गृहप्रवेश करण्यात आला.सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. एका वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करण्यात आला यावेळी सूर्यकांत शहा , माजी ग्रामपंचायत सदस्या विजयमाला शहा , विकास शहा ,चांदणी शहा , विपुल शहा ,  लीना शहा , पार्थ शहा , विशाल शहा , काजल शहा , वैभव शहा , विवेक शहा  तर कडेगाव येथे फुलचंद शहा , संध्या शहा , नितल शहा, भाविका शहा , अनिल शहा , यांच्यासमवेत परिसरातील अबाल वृद्ध नागरिक  उपस्थित होते.

कडेगाव येथील कुटुंबात ५५ वर्षांनी मुलगी झाली म्हणून कृष्णा हॉस्पिटलमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी, रुग्ण यांना बर्फी वाटून फेरा धरून नाचलेही. हा आनंद मुलांसाठी नाही तर मुलींसाठी होता.

Post a Comment

0 Comments