BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कांदे येथील भाजपच्या सरपंच राष्ट्रवादीत


शिराळा (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस शिराळा मतदार संघातील विकासाचा वाढता वेग, होणारी सर्वसामान्यांची कामे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथे आज तालुक्यातील कांदे ग्रामपंचायत सरंपच सौ. मनीषाताई कुंभार, तालुका कुंभार समाजाचे अध्यक्ष नवनाथ कुंभार व सोसायटी संचालक राजेंद्र कांबळे यांनी भाजपला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार प्रसंगी ते बोलत होते. शेतकरी सुतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, निवडणूकीपुरते राजकारण, इतर सर्व वेळ समाजकारणासाठी देत आहे. माझ्या समोर येणारे प्रत्येक व्यक्ती अथवा सर्वजनिक हिताचे काम पूर्ण करणे हे एकमेव उद्दीष्ठ ठेवून काम करत आहेत. त्यामुळे मोठी विकासकामे साधली जात आहेत. निधीबाबत पक्षाचे नेते मंडळी व महाआघाडीचे सरकार खंबीर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली येणार्यांची संख्या दिवसागणीक वाढतच राहणार आहे.

 या प्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष महादेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील, माजी उपसरपंच दिलीप पाटील, निवास पाटील, संभाजी पाटील, धनाजी पाटील, ए. एन. पाटील, शेखर हुजरे, गोविंद कुंभार, संजय पाटील, दत्तात्रय व गोविंद शिंदे, अमोल पाटील, महादेव मोहरेकर, नानासो भडकिमकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments