BREKING NEWS ----- ---शिराळा तालुक्यात २४ ग्रामपंचायतसाठी ८५.१७ टक्के मतदान आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्याच्या हल्यात मुलीचा मृत्यू | Girl dies in leopard attack

 शिराळा,ता.२० : शित्तूर वारुण पैकी तळीचा धनगरवाडा  येथील  सारिका बबन गावडे ( वय ८ ) या दुसरीत  शिकणाऱ्या  शाळकरी मुलीचा बिबटयाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू. ही घटना  आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास  घडली. याच परिसारत दोन वर्षात या दुसऱ्या  मुलींचा मृत्यू  तर दोघावर प्राणघातक  हल्ला झाल्याच्या  घटना घडल्याने  परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,सारिका आई समवेत घरा शेजारी असणाऱ्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी  त्या परिसरातील  गवत व झाडीत दाबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर पाठी मागून हल्ला केला. त्यावेळी तिच्या आईने आरडाओरडा केला असता बिबट्या पळून गेला .मात्र त्या बिबट्याच्या हल्यात सारिका जागीच गतप्राण झाली. त्या नंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. याची माहिती मलकापूर वन विभागास देण्यात आली.त्यावेळी वनक्षेत्रपाल अमित भोसले, वनपाल दत्तात्रय जाधव, शित्तूर चे पोलीस पाटील दीपक भोसले, ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील, शिवाजी पाटील, माजी सरपंच तानाजी भोसले यांनी धाव घेतली.  उपविभागीय वनाअधिकारी  कमलेश पाटील यांनी घटनास्थळी  भेट दिली .

शिराळा तालुक्याचा  पश्चिम भाग आणि शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात असणारे शित्तूर वारुण गाव. याच गावांतर्गत अनेक धनगरवाडे आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असलेल्या या डोंगरालागत  उदगिरी, राघूवाडा, पेगु वाडा,ढवळेवाडी, तळीचावाडा ,विठ्ठलाईवाडी,केदारलिंगवाडी,शित्तुर वारुण, उखळू या भागात   बिबट्याच्या  सतत वावर असून  या  परिसरात सतत पाळीव प्राण्यावर बिबट्याचे हल्ले होत आहेत. आता पर्यंत  २०  पेक्षा जास्त गायी, म्हैसी,५० पेक्षा जास्त  शेळ्या आणि अनेक  कुत्री बिबट्याने ठार केली आहेत .

 तीन वर्षात तीन मृत्यू तर  दोघावर प्राणघातक हल्ले 

एक वर्षा पूर्वी शाहुवाडी तालुक्यातील केदारलिंग वाडी येथील  मनीषा डोईफोडे या दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू.उखळू येथील शौचालयासाठी बाहेर गेलेल्या श्रेयश वडाम या ९ वर्षाच्या मुलावर हल्ला,आज तळीचावाडा येथील  सारिका  गावडे या आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. शिराळा तालुक्यातील तडवळे  ऊसतोड मजुराचा पाच वर्षीय  गणेश श्रीराम कांबिलकर या  बालकावर हल्ला तर दोन वर्षा पूर्वी  तडवळे येथे उसतोड मजुराच्या सुफीयान शमशुद्दीन शेख हा एक वर्षाच्या  बालकाचा मृत्यू. 
डोळ्या समोर मुलीचा घात 
हसत खेळत असणारी सारिका आई सोबत जनावरे चारण्यासाठी हसत हसत घरा बाहेर पडली ती कायमचीच .आपण परत घरी कधीच येणार नाही याची पुसटशी कल्पना त्या चिमुकलीला नव्हती. आपल्या डोळ्या समोर आपल्या पोटच्या गोळ्याचा असा घात होईल असे तिच्या आईला वाटले नाही. आपल्या डोळ्या समोर झालेल्या घटनेने आईने फोडलेला हंबरडा हृदय पिटाळून टाकणारा होता. 

Post a Comment

0 Comments