BREKING NEWS ----- शिराळा येथे मोटरसायकल व चारचाकी अपघातात संतोष उत्तम ताईंगडे राहणार तळमावले ता.पाटण , जि. सातारा हा युवक ठार --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साळशिरंबे कुस्ती मैदानात पै.किरण भगत विजयी Mr. Kiran Bhagat won in Salshirambe wrestling ground

 


उंडाळे :  पै.तानाजी चवरे (आप्पा )वाढदिवस उत्सव  समितीच्या वतीने  आयोजित केलेल्या  कुस्ती मैदानात नंबर १ ची  कुस्ती   पै.किरण भगत  याने  हरियाणाचा पै. अमित कुमार  वरती एक्चाक डावावर  विजयी मिळावला.   पै.माऊली जमदाडे  महाराष्ट्र  केसरी स्पर्धेसाठी  जाणार असल्यामुळे कुस्ती खेळला नाही.  कुस्ती मैदानात उपस्थित  राहिल्याबदल  कुस्ती संघटक पै.तानाजी चवरे यांच्या  हस्ते त्यांचा सत्कार  करण्यात आला. 

 पै.दिग्विजय जाधव व पै.बाळु अपराध   ही कुस्ती बरोबरीत सोडवली.  पै,प्रदिप ठाकुर याने  पै.लिंगराज होनमाने  याला गदा लोट डावावर चित केले.  पै. प्रतिक चवरे . पै.आण्णा पाटील . पै.सुरज पाटील . पै.कर्तार कांबळे.  पै.शिवराज मोहीते,  पै. रणजित मंडले,  पै.सुरेश रुपनर,  पै.वेदांत माने, पै.गणेश  खबाले, पै.यश बोडके,  पै.सौरभ चवरे  यांनी चटकदार कुस्त्या केल्या,  कुस्ती मैदानिसाठी  माजी मुख्यमंत्री  आ.पृथ्वीराज चव्हाण,  हिंदकेसरी पै.दिनानाथ सिंह , डबल महाराष्ट्र  केसरी पै.चंद्रहार पाटील ,अविनाश मोहीते , जयवंतराव जगताप,दिपक लोखंडे (उद्योजक),  शंकरराव खबाले,इंद्रजित चव्हाण , गजानन आवळकर,शिवाजीराव मोहीते, चैतन्य कणसे (R.T,O),दयानंद पाटील , पै.धनाजी पाटील, निवास थोरात,  पै.सचिन शेलार,  पै.हणमंतराव पाटील, बाजीराव शेडगे,  शहाजी शेवाळे, संजय शेवाळे, 

 पै.सचिन बागट, संजय मोरे, पै.महेश भोसले,  सत्यजित पाटील,पै.माऊली उबाळे,  पै.प्रताप नांगणे, पै.राहुल मोरे,  पै.संतोष शेवाळे, पै.सुदाम पावणे, पै.प्रविण  थोरात, पै.प्रमोद पाटील, पै.भरत पवार, पै. काका पाटील, पै.अभिजित शेणेकर, वसंतराव सावंत,  सुरेश पाटील, रघुनाथ चवरे,  उपसरपंच अभिजित चवरे,    पै.अमोल साठे,  सातारा सांगली  कोल्हापूर  जिल्ह्यातुन  आलेले   कुस्ती , राजकीय ,सामाजिक   क्षेञातील अनेक  दिग्ज मंडळी  व  मैदानात उपस्थित होते  मैदानात ६५ते ७० चटकदार कुस्त्या झाल्या. लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाले बद्दल  पै.राहुल पाटील -खुजगाव,  पै.बंडा पाटील -पं.त.वारुण  यांचा सत्कार आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

 दिवाळी  निमित्तानं   आयोजित  करण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धा   विजेत्यांना  बक्षीस  वितरण  करण्यात आले. सदाशिव पाटील ,सुनिल चवरे,सुरेश पाटील, महेश पाटील, धनाजी चवरे, पै.आबा पाटील, विलास चवरे,  पै.प्रविण चवरे,  दत्ताञय चवरे,  संतोष चवरे,संतोष जाधव, निलेश पाटील, सागर पाटील, सागर विभुते,   पै.युवराज सुतार,   नितिन मोरे, पै.प्रतिक चवरे मिञ परिवार यांनी कुस्ती मैदान यशस्वी पार पाडले .

 फेटा स्पेशिलिस्ट  पै.अर्जुन सुर्यवंशी  यांनी मानाचा फेटा बांधुन पाहुण्यांचे स्वागत केले . शिंगवादक शिवाजी गुरव -ओंड ,हालगी वादक आकाश तडाखे , साऊंड सर्व्हिस राहुल वाघमारे, निवेदक पै.सुरेश जाधव -चिंचोली  क्रिडा लक्ष  पै.रमेश थोरात यांनी कुस्ती मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण  केले.

Post a Comment

0 Comments