BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विराज च्या कर्मचाऱ्यांना दिपावली बोनस म्हणून एक पगार व 21 टक्के पगारवाढ |One salary and 21 percent salary hike as Diwali bonus to Viraj's employees




शिराळा: विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या कर्मचाऱ्यांना दिपावली बोनस म्हणून एक पगार व 21 टक्के पगारवाढ केली आहे, अशी घोषणा अध्यक्ष विराज नाईक यांनी केली. 

ते म्हणाले, धान्याधारीत मद्यार्क निर्मिती प्रकल्प विराज इंडस्ट्रिजची स्थापना 2005 साली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. येथून प्रत्यक्ष उत्पादनास डिसेंबर 2007 मध्ये सुरूवात झाली. या माध्यमातून आपल्या भागात पिकणारी उदा मका, ज्वारी, तांदूळ कणी आदीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. या प्रकल्पाला महिन्याकाठी 2 हजार 500 मेट्रीक टन विविध प्रकारचे धान्य लागते. त्यातून मद्यार्क, दैनंदिन 70 मेट्रीक टन ओले पशुखाद्य, तसेच कार्बन डाय ऑक्साईड बॉटलिंग प्रकल्पातून दैनंदिन 15 मेट्रीक टन कार्बन डाय ऑक्साईड मिळतो. 

श्री. नाईक म्हणाले, 2015 साली विराज पशुखाद्य निर्मिती प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. येथे 2016 पासून प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली. मका, पेंड, मळी, डिऑईल्ड राईस ब्रान, राईस पॉलिश ही उत्पादने घेतली जातात. या प्रकल्पातून मुख्यत्वे दैनंदिन 100 मेट्रीक टन पशुखाद्याची निर्मिती केली जाते. त्याचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रात केला जात आहे. ही उत्पादने वापरल्याने दुभत्या जनावरांच्या दुधाची वाढ होते. जनावरांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.

 इंडस्ट्रिजच्या आजवरच्या प्रगतीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळेच ही प्रगती झाली आहे, याची जणीव ठेवून या दिपावलीस एक पगार बोनस व सर्व कामागारांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी 21 टक्के पगारवाढ करण्यात येत आहे. त्यामुळे 450 कामगारांच्या कुटुंबाची ही दिपावली अधिक गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. 



Post a Comment

0 Comments