BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उल्टी तस्करीच्या तपासात काही नावे निष्पन्न A few names emerged in the investigation of vomit smuggling

 


शिराळा,ता.१८:सागाव (ता.शिराळा) येथील व्हेल माशाच्या उल्टी तस्करीच्या तपासात आज  पथकास काही नावे निष्पन्न झाली आहेत. आज सोमवारी ही काही घरांची झाडाझडती घेतली आहे.अनेक संशयितांना याचा सुगाव लागल्याने काही जण पसार झाले आहेत. तपासासाठी राज्यातील अनेक  ठिकाणी शोध कार्य गतीने सुरू झाले असल्याची  माहिती सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे यांनी दिली.

  शुक्रवारी  (ता.१५)  रोजी  व्हेल मासा उल्टी  (अंबरग्रीस ) तस्करी प्रकरणी  सांगली,कोल्हापूर,लातूर जिल्ह्यातील  रोहन सर्जेराव पाटील ,प्रथमेश सुरेश मोरे, दिग्विजय उत्तम पाटील, लक्ष्मण सुखदेव सावळे ,दत्तात्रय आनंदराव पाटील या पाच जणांच्या  टोळीला बनावट ग्राहकाच्या मदतीने  सागाव येथे  वन विभागाने मोठ्या शिताफीने अटक करून   त्यांच्या कडून  ८ ग्रॅम उलटी चा नमुना ,पाच मोबाईल,दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्यांना  गुरवार ता.२१ डिसेंबर पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.दोन  वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून  शोध  मोहीम सुरु आहे.उपवनसंरक्षक निता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  वनसंरक्षक डॉ. अजित साजणे ,मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील  यांच्या  नेतृत्वाखाली ही कारवाई वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल  वाजे, वनरक्षक हणमंत  पाटील, विशाल डुबल,भिवा कोळेकर,रजनिकांत दरेकर,बाबासो गायकवाड,मोहन सुतार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या  पथकाने तपास यंत्रणा गतिमान केली आहे.


Post a Comment

0 Comments