BREKING NEWS ----- --शिराळ्यात अंबरनाथची बैलजोडी ठरली सम्राट केसरीची मानकरी --------------------------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजीराव चौगुले Shirala Taluka Marathi Journalist Association as Taluka President Shivajirao Chougule


शिराळा,ता.४  : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न असणाऱ्या शिराळा तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दै. सकाळचे तालुका  प्रतिनिधी शिवाजीराव चौगुले  तर  कार्याध्यक्षपदी  दै.हॅलो प्रभातचे नारायण घोडे  आणि  पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी दै.तरुण भारतचे प्रीतम निकम तर कार्याध्यक्षपदी दै.प्रभातचे  रवी यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

शिराळा येथील संत गाडगे महाराज सांस्कृतिक सभागृहात झालेल्या मराठी पत्रकार संघटनेच्या बैठकीत सन २०२४-२५  या सालाकरिता कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, मावळते अध्यक्ष संजय घोडे,मनोज मस्के,संतोष बांदिवडेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली. 

यावेळी  उपाध्यक्षपदी दै.सकाळचे एन.जी.पाटील व साप्ता. ज्ञानदर्शन वार्ता & महासह्याद्री न्युज पोर्टलचे संपादक दत्तात्रय पाटील,सचिवपदी सा.जनलोक वार्ताचे विशाल खुर्द, खजिनदारपदी भारत २४ चॅनेलचे संपादक डॉ.सुनील पाटील,संपर्क प्रमुख दै.कर्मयोगीचे प्रताप कदम, प्रसिद्धी प्रमुखपदी सा.दै.वसंतसागरचे संपादक आनंदा सुतार   यांची  तर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या उपाध्यक्षपदी दै.लोकमतचे अरुण पाटील,दै.पुण्यनगरीचे अजय जाधव,सचिवपदी सा.जनलोक वार्ताचे जितेंद्र गायकवाड,संपर्क प्रमुखपदी  दै. बंधुता चे विशाल खांडेकर,प्रसिद्धी प्रमुखपदी दै.पुण्यनगरीचे गणेश माने यांच्या निवडी बिनविरोध  करण्यात आल्या.सेवा निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून संजय घोडे दै.पुण्यनगरी संतोष बंदिवडेकर दै.महासत्ता, नवनाथ पाटील द शिराळा न्यूजचे संपादक, विजय गराडे दै,पुण्यनगरी , रणजित चव्हाण संपादक जनलोक वार्ता , हिंदुराव पाटील दै.जनप्रवास,चंद्रकांत गुरव दै. केसरी,भास्कर गुरव दै.बंधुता ,हिम्मतराव नायकवडी दै,सकाळ,प्रमोद क्षीरसागर दै.लोकमत, शिवाजी कुंभार एस.टी .एन.मराठी चॅनेल, सुरेश पवार दै.पुण्यनगरी,सुरेश शेडगे दै.मुक्तागीरी,याकुब मुजावर दै.जनमत,महादेव हवलदार मासिक जीवन गौरवचे सह संपादक ,सुर्यकांत जाधव दै.तरुण भारत, अनिल झाडे दै.केसरी, दीपक तडाखे, दै.तरुण भारत,दत्ता तडाखे दै.केसरी,धनाजी कोतवाल प्रतिनिधी भारत २४  यांची निवड करण्यात आला. निवडी नंतर नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. 


Post a Comment

0 Comments