BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अपघात प्रकरणी अज्ञातावर गुन्हा Crime against unknown person in case of accident



शिराळा ,ता.२६:सागाव  ता.शिराळा येथील  भागाईवाडी ते सागाव फाटा दरम्यान ज्योतिबा हॉटेल जवळ सागाव गाव हद्दीत  विकास मारुती शेळके (वय ४०)  रा.पुनवत यांच्या दुचाकीला  धडक देवून जखमी केल्या प्रकरणी अज्ञातावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना २० मे रोजी रात्री साडे आठ ते १२ वाजण्याच्या पूर्वी घडली. याबाबत  सीमा विकास शेळके वय ३१ रा.पुनवत  यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २० मे रोजी रात्री अज्ञात वाहन हे भरधाव वेगाने, निष्काळजीपणे चालवून विकास मारुती शेळके यांच्या दुचाकीला भागाईवाडी ते सागाव फाटा दरम्यान ज्योतिबा हॉटेल जवळ  जात असताना  धडक देऊ  त्यास गंभीर जखमी केले. त्या नंतर अपघाताची माहिती  न देता निघून गेला. म्हणून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवलदार बाजीराव भोसले करत आहेत.

 

Post a Comment

0 Comments