शिराळा,ता.१:येथील बाह्य वळण रस्त्यावरील हनुमान मंदिर नजीक (ता.२९) जुलै रोजी झालेल्या अपघातात शिक्षक दिलीप खोत ठार झाले होते.या अपघात प्रकरणातील ट्रक चालक सयाजी सर्जेराव खोत (वय ४३रा.ओझर्डे घबकवाडी,ता वाळवा)हा शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला.पोलिसांनी ट्रक सह चालकास ताब्यात घेतले आहे.
याबाबत शिराळा पोलीसातून समजलेली माहिती अशी,२९जुलै रोजी झालेल्या अपघातात देववाडी येथील शिक्षक दिलीप शंकर खोत (वय ५३, रा.देववाडी ) यांचा मृत्यू झाला होता.अपघातानंतर वाहन निघून गेले होते.त्यामुळे अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत होते.पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पाटील, अमर जाधव यांनी सिसिटीव्ही व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक पनवेल येथे असल्याचे समजले.त्यावेळी संबंधित चालकाकडे या घटनेची विचारपूस केली. या नंतर हा ट्रकचालक ट्रकासह पोलीस ठाण्यात हजर झाला . दिलीप खोत हे वाकुर्डे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.ते२९ जुलै रोजी दुपारी वाकुर्डे बुद्रुक येथून देववाडीला मोटारसायकल वरून निघाले होते. त्यावेळी त्यांना शिराळा येथील बाह्यवळण रस्त्यावर हनुमान मंदिर नजिक आले असता अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलीस हवलदार संदीप पाटील करत आहेत.
0 Comments