BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रक्षोभक भाषण प्रकरणी शिराळा पोलिसात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल A case has been registered against Nitesh Rane in Shirala police in the case of provocative speech



 शिराळा,ता.२७ :शिराळा येथे  हिंदु जन आक्रोश मोर्चावेळी झालेल्या सभेत हिंदु व मुस्लीम धर्मीयांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, शत्रूत्व वाढेल, दोन्ही समाजामध्ये व्देषाची भावना वाढीवल्या जातील, एकोपा टिकण्यास बाधक ठरेल, मुस्लीम व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी आमदर  नितेश नारायण राणे (रा.कणकवली ता. कणकवली जि .सिंधुदुर्ग ) यांच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलीस हवलदार सचिन कांबळे यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. हि घटना १९ सप्टेंबर २०२४ रोजीसायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. 

याबाबत  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संभाजी ब्रिगेडचे अधिवेशनात हिंदु देवदेवतांचा अपमान झाल्याच्या  निषेधार्थ  गुरुवारी १९ सप्टेंबर २०२४ रोजी शिराळा येथील आंबामाता मंदीर ते जुने तहसिलदार कार्यालय या या मार्गावरुन हिंदु जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. जुने तहसीलदार कार्यालय येथे या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.यावेळी आमदार नितेश राणे, मणदूर येथील अनिल अरुण देवळेकर,शिराळा येथील सुनिल नामदेव धुमाळ यांच्या प्रमुख  उपस्थितीत सभा झाली. या सभेत आमदार  नितेश  राणे  यांनी पुढे येणाऱ्या  ईद व मोहरमच्या वेळी झालेल्या दगड फेकीचा हिशोब चुकता करायचा आहे. त्यांच्यामध्ये भिती निर्माण झाली पाहिजे. ३२ शिराळयातील हिंदु हा जागृत आहे. त्याच्याकडे असलेले प्रत्येक आव्हान तो परत पाठवतो हा संदेश त्या जिहाद्याकडे गेला पाहिजे असे व  इतर प्रकारे मुस्लीम धर्मीयांच्या धार्मिक श्रध्दांचा अपमान होईल अशा प्रकारचे भाषण केले.पुढील येणा-या ईद व मोहरमच्या वेळी झालेल्या दगडफेकीचा हिशोब चुकता करायचा असे आवाहन करुन हिंदु व मुस्लीम धर्मीयांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल, शत्रूत्व वाढेल, दोन्ही समाजामध्ये व्देषाची भावना वाढीवल्या जातील, एकोपा टिकण्यास बाधक ठरेल, मुस्लीम व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक भाषण केले.त्यामुळे त्याच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Post a Comment

0 Comments