शिराळा,ता.२७ :मादळेवाडी( ता शिराळा) येथे प्राथमिक शाळेच्या शिक्षकाच्या मोटरसायकल चोरी प्रकरणी अज्ञातावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १९ सप्टेंबर २०२४ सकाळी दहा ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत बाबासाहेब महिपती गुरव (वय ५८) व्यवसाय नोकरी रा .लाडेगाव (ता.वाळवा) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घटना १९ सप्टेंबर २०२४ सकाळी दहा ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मादळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ शिक्षक बाबासाहेब गुरव यांनी मोटरसायकल लावली होती. ती अज्ञात चोरट्याने नेली. अधिक तपास पोलीस हवलदार सुभाष पाटील करत आहेत.
0 Comments