शिराळा,ता.२७ :येथील सांगली सॅलरी ऑनर्स को ऑपरेटीव सोसायटी शाखा शिराळा येथील चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अभिजीत सर्जेराव पाटील रा .बिसूर यांनी शिराळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० ऑगस्ट सायंकाळी पावणे सहा ते ११ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहा च्या दरम्यान घडली.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १० ऑगस्ट सायंकाळी पावणे सहा ते ११ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहा च्या दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी शाखेचा मुख्य लोखंडी ग्रील दरवाजा व आतील लाकडी दरवाजाची तीन कुलपे तोडून ९६० रुपये रोख रक्कम व १५०० रूपये किंमतीचा सी सी टी व्ही कॅमेरा चोरून नेला . याबाबत पुढील तपास पोलीस हवलदार सुनील पेठकर करत आहेत.
0 Comments