BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बँक कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू Sudden death of a bank employee

 शिराळा,ता.२७ :सागाव (ता.शिराळा) येथील युनियन बँकेत कर्मचारी  माधुरी आनंदा संकपाळ ( वय ३८)  मुळ गाव गाताडवाडी (ता. वाळवा).सध्या रा.सागाव यांचा आकस्मिक  मृत्यू  झाला. याची शिराळा पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत शिराळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली.ही घटना २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडे आठ पूर्वी घडली.मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाला  नंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल .

याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल (ता.२५) रोजी माधुरी आनंदा संकपाळ ह्या  युनियन बँक  सागाव येथुन घरी येत असताना चक्कर येवुन रस्त्या कडेला  पडल्या. त्यांना  बाळासो गणपती मोहिते (रा. सागाव)  यांनी उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेले .त्यावेळी  डॉक्टरांनी तपासले असता  उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस हवलदार सुर्यकांत कुंभार करत आहेत.

कुटुंबाचा आधार हरपला  

दहा वर्षा पूर्वी माधुरीचे पती आनंदा यांचे हि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते हि  बँकेत कर्मचारी होते. त्यांच्या जागी अनुकंपावर माधुरी यांना नोकरी लागली.त्या सागाव येथे कार्यरत होत्या. त्या सासू इंदुताई व मुलगी आदिती सोबत सागाव येथे भाडोत्री रहात होत्या.त्यांच्या निधनाने वृद्ध इंदुताई  व मुलगी आदिती यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आदिती सागाव येथे ९ वीत शिकत आहे. आई वडिलांच्या अकाली निधनामुळे आदितीला आता वृद्ध आजीच्या आधारावर तर मुलगा व सून गेल्याने इंदुताईला  नात आदितीच्या आधारावर वृद्धापकाळ पेलावा लागणार आहे. त्यामुळे या  दुदैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.     


Post a Comment

0 Comments