BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे बुद्रुकचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल BJP workers of Wakurde Budruk joined NCP


शिराळा : शिराळा मतदार संघातील जनता नेहमी विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिले आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. 

वाकुर्डे बुद्रूक (ता. शिराळा) येथील भाजपच्या माजी उपसरपंचांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार प्रसंगी ते चिखली (ता. शिराळा) येथे बोलत होते. 

आमदार नाईक म्हणाले, शिराळा मतदार संघातील जनतेने नेहमी विकास साधणाऱ्या नेतृत्वाला साथ दिली आहे. मी फक्त राजकारणासाठी जनतेसमोर जात नाही. वैयक्तिक व सार्वजनिक कामे, प्रत्येक गावातील, विभागातील विकासात्मक बदल घडविण्यासाठी नेहमी तत्पर राहून काम करत आलो आहे. बोलणे आणि प्रत्यक्ष कृती करणे यात खूप अंतर आहे. शिराळा मतदार संघात कार्यरत असणाऱ्या ‘राजारामबापू’, ‘विश्वास’, ‘यशवंत’ व ‘विराज’ उद्योग समूहातील संस्था अग्रेसर राहून सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटत आहे. या संस्थांच्या माध्यमातून विकासात्मक बदल घडले वा घडत आहेत. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. विरोधी गटातील अनेक कार्यकर्ते भूलथापांना कंटाळून विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. भविष्यात हा ओघ वाढतच राहणार आहे. 

माजी सरपंच संभाजी पाटील यांनी स्वागत केले. वाकुर्डे बुद्रूकचे माजी उपसरपंच रमेश दत्तू जाधव, अनिकेत गोविंद माने, सुनील वसंत माने, सदाशिव आनंदा माने, जयसिंग रामचंद्र सावंत, गणेश गणपती सावंत, श्रीरंग तुकाराम सावंत, सचिन राजाराम जाधव, वसंत रामचंद्र नायकवडी, यशवंत रामचंद्र नायकवडी, सागर पांडुरंग नायकवडी, मधुकर आनंदा माने यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वांचे स्वागत व सत्कार आमदार मानसिंगभाऊ यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी सुभाष पाटील, तानाजी पाटील, सोसायटीचे अध्यक्ष तानाजी माने, बाबासो माने, उदय माने आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments